समाजासाठी अनवाॅटेंड चित्रपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल- जंगले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाजासाठी अनवाॅटेंड चित्रपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल- जंगले

  पानेगाव/वेबटीम:-  स्त्रीभ्रूणहत्या वर आधारित अनवाॅटेंड लघुपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास पानेगाव (ता.नेवासा) कै.पोपटराव सभागृहात ल...

 पानेगाव/वेबटीम:- 

स्त्रीभ्रूणहत्या वर आधारित अनवाॅटेंड लघुपट नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास पानेगाव (ता.नेवासा) कै.पोपटराव सभागृहात लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले श्रीफळ वाढवून कॅमेरा पुजन करते  वेळी  व्यक्त केला. 

अध्यक्षस्थानी तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप हे होते. यावेळी जंगले बोलताना सांगितले की,मुळाथडी परीसर हा निसर्गाची मोठी देणगी लाभली असून नदी,वृक्ष, तसेच बागायती भाग, नामदार शंकरराव गडाख पाटील तसेच सभापती सुनीलभाऊ गडाख पाटील यांनी परीसराचा केलेल्या विकासकामांमुळे हे शक्य झालं असून येणारे- जाणारे आपल्या परीसरातील निसर्ग सौंदर्य रमणीय वातावरण बघून अनेकांचे लक्ष वेधून घेत असते.त्यामुळेच या अगोदरही मकरंद अनासपुरे तसेच इतर कलाकारांनी येथे भेटी देवून चित्रपट चित्रिकरण करण्यात आले होते.तसेच चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात आल्याचं सांगितलं होतं.  आज अनवाॅटेंड स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी लघुपट चित्रपट चित्रिकरणमुळे आपल्या परीसराचा नावलौकिक वाढून भविष्यहि मोठा वाव आपल्या परीसराला मिळेल असा विश्वास तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप यांनी व्यक्त केला. 

या लघुपट विषयी असिस्टंट डायरेक्टर सौ.दिपाली पुराणीक यांनी कलाकारांन माहिती दिली. डायरेक्टर पटकथा संवाद शुभम जैन, निर्माता सुनील क्षिरसागर, कॅमेरामन सचिन गायगोवे,रंगभुषा विकास घोगरे, कलाकार म्हणून प्रमोद कसबे,झी मराठी फेमदत्ता उबाळे, भार्गवी पुराणिक,आरोही जाधव,बासुरी घोगरे,मोहिनी पुराणिक, प्रविण जंगले, मनिषा बोडॅ,किसन जगताप आदी सह मान्यवर कलाकार या मध्ये दिसणार आहे. 

कार्यक्रमासाठी उपसरपंच-रामभाऊ जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले संदिप जंगले, सतिश जंगले निवृत्ती जंगले, कै पोपटराव संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जंगले, सचिव भाऊसाहेब बोडॅ, बाबासाहेब शेंडगे, मोहनराव जंगले,गिताराम जंगले ज्ञानेश्वर जंगले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संदिप जंगले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत