राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीने रविवार दि.६ जुन रोजी शिवस्वराज्य दिना निमीत्ताने प्रथमच भगवी गुढी उभारली आहे. लो...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीने रविवार दि.६ जुन रोजी शिवस्वराज्य दिना निमीत्ताने प्रथमच भगवी गुढी उभारली आहे.
लोकनियुक्त सरपंच अब्बास शेख दयावान यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन करून हि गुढी उभारण्यात आली.याप्रसंगी सदस्य शिवाजी पांडुरंग थोरात, शामराव गोविंदराव आढाव, दिलावर पठाण, अण्णासाहेब नाथाजी तोडमल, मनोज बाळासाहेब आढाव, रणजीत भागवत आढाव,चांगदेव गवजी आढाव, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव ,माजी संचालक निवृत्ती आढाव ,ह.भ.प.संभुगिरी महाराज गोसावी ,पोलीस पाटील भाऊराव आढाव, मनोज खुळे, हरिभाऊ आढाव ,बालू भिंगारे, ग्राम विकास अधिकारी मुरलीधर रगड आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत