कोपरगाव/प्रतिनिधी मानव जातीने कुरघोड्या करून निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. याचा परिणाम म्हणजे कोविडच्या संकटात प्राणवायूची होत अस...
कोपरगाव/प्रतिनिधी
मानव जातीने कुरघोड्या करून निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. याचा परिणाम म्हणजे कोविडच्या संकटात प्राणवायूची होत असलेली कमतरतेवरून लक्षात येते. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यास प्रतिसाद देत राजमुद्रा प्रतिष्ठानने शहरातील दत्तनगर व गोरोबा नगरमध्ये शनिवारी (ता.५) वृक्षारोपण केले.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध कार्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या राजमुद्रा प्रतिष्ठानने पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार आमदार काळे यांनी केलेल्या संकल्पास भरभरून प्रतिसाद देत शहरातील दत्तनगर व गोरोबा नगरमध्ये विविध वृक्षांचे रोपण केले आहे. याद्वारे त्यांनी पर्यावरणासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांबाबत 'झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेशही दिला आहे. सदर उपक्रम वाल्मिक लहिरे, संतोष बरसे, किरण कोपरे, रवी वाघ, अजय देसाई, आकाश पवार, दीपक गायकवाड, बाबासाहेब देवतरसे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत