स्वराज्य प्रतिष्ठानकडून कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये वृक्षारोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वराज्य प्रतिष्ठानकडून कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये वृक्षारोपण

कोपरगाव/प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी आमदार आशुतोश काळे यांच्या मार्गदर्शनाखालील दहा हजार वृक्ष ल...

कोपरगाव/प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी आमदार आशुतोश काळे यांच्या मार्गदर्शनाखालील दहा हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून स्वराज्य प्रतिष्ठानने शनिवारी (ता.5) शहरातील बाजारतळ परिसरात वृक्षारोपण करुन निसर्ग वाचविण्याचा संदेश दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे, चंदूकाका उदावंत, राजू कपोते, प्रकाश भडकवाडे, प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप देवळालीकर, गोरख कानडे, गौरव जंगम, कैलास नागरे, शुभम भुजबळ, निरंजन उदावंत, तुषार चिकणे, स्वप्नील दुसाने, समर्थ दिक्षीत, बाळा देवकर, बाळासाहेब नवसे, नंदू जाधव, सोमेश शिंदे, अमोल देवकर, स्वामी दिक्षीत, ओम कपोते, राशिद रंगरेज, संदीप आहेरराव आदी उपस्थित होते.

दरम्यान, स्वराज्य प्रतिष्ठानने कायमच सामाजिक उपक्रम राबवून ओळख निर्माण केली आहे. कोविडच्या संकटातही गरजूंना मदत केली आहे. सद्यस्थितीत पर्यावरणाची होत असलेली हानी आणि प्राणवायूची कमतरता लक्षात घेऊन आमदार काळे यांनी केलेल्या संकल्पाला साथ देत प्रभाग पाचमधील बाजारतळ परिसरात वृक्षारोपण केले आहे. याबद्दल प्रतिष्ठानचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत