वृक्षसंवर्धन व पर्यावरणरक्षण ही काळाची गरज - पांडुरंग अभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वृक्षसंवर्धन व पर्यावरणरक्षण ही काळाची गरज - पांडुरंग अभंग

नेवासा(वेबटीम) कोरोना काळात ज्यावेळी ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गाकडून फुकट मिळणा-या ऑक्सिजनची किंम...

नेवासा(वेबटीम)

कोरोना काळात ज्यावेळी ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गाकडून फुकट मिळणा-या ऑक्सिजनची किंमत कळाली. त्यामुळे वृक्षसंवर्धन व पर्यावरणरक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त नेवासा तालुक्यातील सुरेशनगर येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग बोलत होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात आपल्याला पर्यावरणातील हवेची गरज व महत्व कळाले. ऑक्सिजन सिलिंडर विकत घेताना माणसाला फुकट मिळणाऱ्या हवेची व पाण्याची किंमत कळली म्हणूनच आपण झाडे लावून ती जतन केली पाहिजेत. यावेळी देसाई देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. महिला आरक्षण, शेतकरी वर्गाच्या विकासासाठीही या पक्षाचे खूप योगदान आहे. माजी सभापती काशीनाथ नवले, डॉ.अशोक ढगे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याची माहिती दिली.


याप्रसंगी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, शिवाजी कोलते, अशोक मिसाळ, दादासाहेब गंडाळ, गणेश गव्हाणे, बाळासाहेब आरगडे, अभिषेक पटारे, बापू शेगर, अशोक पाषाण, अविनाश उभेदळ, मुख्याध्यापक खंडेराव उदे, उपाध्यापिका भगत, गायकवाड, झिंजूर्डे, अनिताताई उभेदळ, अंगणवाडी सेविका शशिकला राऊत, सुरेखाताई शेटे, मंगलताई देशपांडे, मनिषाताई विधाटे, सनी साळवे, गंगाराम बाबर, साहेबराव पवार आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्तविक निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित ग्रामपंचायतचे सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी केले. आभार उपसरपंच भागचंद पाडळे यांनी मानले तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक डॉ.रेवणनाथ पवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत