शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न

  नेवासा(प्रतिनिधी)  शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष 2021 -22 नियोजना संबंधी विद्यालयात covid-19 संबंधित सर्व नियमांचे पालन कर...

 नेवासा(प्रतिनिधी)

 शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष 2021 -22 नियोजना संबंधी विद्यालयात covid-19 संबंधित सर्व नियमांचे पालन करून शनिवारी व्यवस्थापन समिती संपन्न झाली.

 सभेमध्ये वेळोवेळी येणाऱ्या शासन निर्देशांचे पालन करून पुढील सूचना येईपर्यंत ऑनलाईन अध्यापनाची कार्यवाही करण्याचे ठरले तसेच सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी वर्गाचे नवीन प्रवेशासंबंधी नियोजन करण्यात आले. विद्यालयाच्या वृक्षवल्ली नी नटलेल्या व स्वच्छ परिसराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

   शासन आदेशानुसार विद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे ठरले तर त्यासाठीची आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे.

    सदर सभेसाठी मुळा सहकारी साखर कारखाना सोनई चे संचालक श्री बाबासाहेब पाटील जगताप, तामसवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री चंद्रकांत पाटील जगताप, स्कूल कमिटी सदस्य श्री संजय पाटील काळे, श्री  कर्णासाहेब अाैटी, श्री गंगाधर (मेबर) खेडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत