राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना जमावाने चोपले! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना जमावाने चोपले!

देवळाली प्रवरा(वेबटीम) खासगी गाडीतून आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी मतीमंद असलेल्या निरपराध व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्या...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

खासगी गाडीतून आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी मतीमंद असलेल्या निरपराध व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याने चवताळून नागरिकांनी त्या कर्मचाऱ्यांना बेदम चोप दिला. नशेत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी विनाकारण निरपराध चिकनवाला व अन्य एक मतिमंद  इसमास केलेली मारहाण सहन न झाल्याने उपस्थित लोकांनी या दोघांना चोप दिला.आपण केलेली चूक लक्षात आल्याने व जमावाचा रुद्र अवतार पाहून या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचा प्रकार चर्चेतून समजला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.मतिमंद इसमास व्यक्तीचा मारहाणीचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याची कुमक तातडीने आली मात्र ते कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेले होते.


  मतिमंदास मारहाण केलेला व्हिडिओ

    दारूबंदी उत्पादन शुल्कचे हे कर्मचारी दोघेच खासगी गाडीतून कसे आले?निरपराध लोकांना मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला?हे कर्मचारी अधिकृत  गणवेश घालून न येता सिव्हिल ड्रेस वर कशासाठी आले होते?त्यांना नागरिकांनी चोप दिल्यानंतर पोलिस ठाण्यात न जाता कुठे गेले?हे कर्मचारी खरंच दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे होते की तोतया होते? ते दोघेही नशेत असल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणेआहे ही बाब अत्यंत गंभीर नाही का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले असून अशा घटनांमुळे लोकांचे मनोधैर्य वाढून इतर शासकीय कर्मचारी, पोलीस खात्याला याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई होणे अभिप्रेत आहे.

   दरम्यान आज सकाळी दारूबंदी व उत्पादन शुल्क च्या पथकाने देवळाली प्रवरा येथे अवैध दारू व्यवसायवर छापेमारी केली मग हे दोन कर्मचारी त्या पथकातील होते का?हे दोघेजण खरच दारूबंदी शुल्क विभागाचे होते का तोतया होते असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ काढल्याने ते कर्मचारी व त्यांची खासगी गाडी त्या व्हिडीओ मध्ये दिसून आली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत