तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष व कोपरगावचे मंडलाधिकारी ज्ञानदेव भुजबळ यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न !! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष व कोपरगावचे मंडलाधिकारी ज्ञानदेव भुजबळ यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न !!

  कोपरगाव/वेबटीम:- अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष व मंडळाधिकारी कोपरगाव श्री भुजबळ ज्ञानदेव ही नियत वयोमानानुसार  दिनांक ३१/०५/२०२१ रोज...

  कोपरगाव/वेबटीम:-

अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष व मंडळाधिकारी कोपरगाव श्री भुजबळ ज्ञानदेव ही नियत वयोमानानुसार  दिनांक ३१/०५/२०२१ रोजी सेवानिवृत्त होत असल्याकारणाने तहसील कार्यालय कोपरगाव  येथे सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन  केले होते.

सदर कार्यक्रमास कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब,कोपरगाव तलाठी संघाचे अध्यक्ष बडदे अप्पा, शिंदे अप्पा, नायब तहसीलदार मनिष कुलकर्णी. तसेच तालुक्यातील सर्व तलाठी बांधव उपस्थित होते.

कोपरगाव तहसील कार्यालय व तलाठी संघटनेच्या वतीने अध्यक्ष योगेश चंद्रे साहेब, व तलाठी कोपरगाव यांनी  त्यांचा सत्कार करून सर्व तलाठी यांच्या वतीने पुढील आयुष्यात शुभेच्छा दिल्या सदर सूत्रसंचालन कोपरगाव तलाठी संघाचे अध्यक्ष श्री बडदे यांनी केले तर अनुमोदन श्री गणेश गर्कल यांनी दिले तसेच  कोपरगाव तलाठी संघाचे अध्यक्ष बडदे आप्पा व योगेश चंद्रे साहेब यांनी  आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बडदे आप्पा  म्हणाले की मंडळ अधिकारी कोपरगाव श्री भुजबळ ज्ञानदेव यांनी तलाठी  पदा पासून ते मंडळ अधिकारी पदा पर्यंतची अशी ३८ वर्षाची प्रदीर्घ सेवा उत्तम रित्या पूर्ण केली तसेच तलाठी घडवण्याचे काम केले. नवीन पिढी बरोबर संगणकीय ज्ञान आत्मसात करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे व आदर्श नवीन रुजू होणाऱ्या तलाठी बांधव यांच्या समोर ठेवला आहे.तहसीलदार साहेब यांनी मंडळ अधिकारी कोपरगाव ज्ञानदेव भुजबळ साहेब यांनी केलेल्या सेवेचे कौतुक करत त्यांना भावि वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.



मंडळ आधिकारी कोपरगाव श्री भुजबळ ज्ञानदेव यांनी आपले सेवेतील अनुभव सर्वांसमोर ठेवून उत्तम सेवा देण्याची सर्व तलाठी यांना विनंती केली.

सदर सेवापुर्ती कार्यक्रमाबरोबरच रवंदा,दहेगाव बोलका येथील मंडळ अधिकारी दुशिंग यांची राहुरी येथे निवडून शाखेचे नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली म्हणून यांचा सत्कार करण्यात आला .

 कार्यक्रमाचे आभार कोपरगाव तलाठी संघाचे अध्यक्ष बडदे आप्पा  यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तहसीलदार  योगेश चंद्रे साहेब, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी मॅडम , कोपरगाव प्रभारी मंडळ अधिकारी भांगरे, कोपरगाव तलाठी संघाचे अध्यक्ष श्री बडदे उपाध्यक्ष श्री ठाकरे कोपरगाव शहर तलाठी तांगडे कोकमठाण  तलाठी चाकणे , धरणगाव तलाठी पऱ्हाड, शिंदे, लहाने, जावळे, कदम, निवडणूक शाखेचे रणनवरे, तहसील कार्यालयातील शिरसाठ, माळवदे व इतर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत