मा.मंत्री जानकरांची राहुरी फॅक्टरी येथे भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मा.मंत्री जानकरांची राहुरी फॅक्टरी येथे भेट

  राहुरी/वेबटीम:- राजकीय व शासकीय नोकरांनी आपन राजे नसुन लोकांचे विश्वस्त आहोत या हेतुने काम केले पाहीजे सत्ता ह्या लोक कल्याणा साठी वापरायच...

 राहुरी/वेबटीम:-

राजकीय व शासकीय नोकरांनी आपन राजे नसुन लोकांचे विश्वस्त आहोत या हेतुने काम केले पाहीजे सत्ता ह्या लोक कल्याणा साठी वापरायच्या असतांत लबाड्या व जातीय तेढ निर्माण करून जास्त दिवस सत्ता टिकून राहीते असे नाही लोकाच्या हाताला काम पाहीजे असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण गो शाळेचे अध्यक्ष ललित चोरडीया याच्या कडे सदिच्छा भेट दिली त्यावेळी बोलताना व्यक्त केले छोट्या पक्षाची शिडी घेऊन सत्तेच्या राज गादीवर बसायचे व नंतर पहिले पाढे पंचावन्न ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना गुलाम बनविले आहे अनेक लोकांवर अन्याय होत आहे मात्र लोक तो मुकाट्याने सहन करतात सरकारच्या मदतीने मोठ्या झालेल्या संस्था याच्या खाजगी असल्या सारखे वागतात.

आपण मंत्री असताना दुधाला पाच रुपये भाव वाढ केली होती आता किमान दहा रुपये भाव वाढ करायला हवी ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट करायची असेल तर दुध दर वाढ जुरुची आहे.

आपल्या कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही अथवा आपन कोणाला बाधील नाही आता राष्ट्रीय समाज  पक्षात अण्य समाजातील धर्मनिपक्ष लोकं येत आहे. 

लोकांच्या हाताला काम पाहीजे व काहीना राम पाहीजे मात्र आमच्या घामाला योग्य दाम द्या संध्या कोरोना महामारी मध्ये अनेकांनी जीवाची परवा न करता काम केले आहे तसेच अनेकांना कोरोना मुळे मृत्यु देखील आला आहे घरातील कर्ते मानसे दगावली आहे अशा कुटुंबातील स्त्रीयांना शासनाचे मदत करावी 

सध्या जानकर महाराष्ट्र दौरयावर असुन अनेक ठिकाणी थेट ग्रामीण जनतेच्या सहवासात अथवा अध्यात्मिक व्यक्ती सान्निध्यात राहुन व्यथा जानुन घेत आहेत .

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे , श्रीकृष्ण गो शाळेचे अध्यक्ष ललित चोरडीया, डाॅ किशोर खेडेकर ,डाॅ हर्षद चोरडीया, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत