राहुरी/बेबटिम:- राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यू काका ढाबावर दारू विक्री होत असल्याने पंधरा दिवसाच्या आत प...
राहुरी/बेबटिम:-
राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यू काका ढाबावर दारू विक्री होत असल्याने पंधरा दिवसाच्या आत पोलीसांनी चौथ्यांदा कारवाई करून हाॅटेल चालकाला दणका दिला आहे.
राहुरी तालुक्यामध्ये दारू विरोधी कारवाया करण्यासाठी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दंड थोपटले आहेत तरी देखील अनेक हॉटेलमधे छुप्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचे समजात पोलीस निरीक्षक दुधाळ,पोकाॅ.अजिनाथ पाखरे आदिंसह पथकाने हॉटेल न्यू काका ढाब्यावर छापा मारला असता याठिकाणाहून १४७५ रूपयांच्या दारूंच्या बाटल्या जप्त केल्या असुन हाॅटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत