श्रीरामपूर/(वेबटीम):- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी आज अचानक श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाणला (श्रीरामपूर...
श्रीरामपूर/(वेबटीम):-
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी आज अचानक श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाणला (श्रीरामपूर) भेट दिली.अडबंगनाथाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.
मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करून कामांविषयी माहिती घेतली . सकाळी 9 ते 12 तीन तास थांबून सर्व प्रकारची महाराजांशी चर्चा केली. मंदिरातील नक्षीकाम बघून राम अश्रूंची शिळा व अडबंगनाथ यांनी बारा वर्ष तप केलेली भूमी हे सर्व बघून खूपच समाधान व्यक्त केले.या आपल्या संस्थानच्या कामासाठी मला कधी ही फोन करा. मग जिल्ह्यातील राज्यातील आणि दिल्लीतील ते कुठलेही काम असो मी मार्गी लावेल, अनेक अध्यात्मिक विषयावर त्यांनी चर्चा केली. मंदिराचा संपूर्ण परिसर, सुंदर झाडी, सुंदर वातावरण, सुंदर मंदिर हे सर्व बघून अत्यंत समाधान व्यक्त केले. स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांनी या परिसरात येऊन भेट दिल्याबद्दल महादेव जानकर यांचे आभार व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत