देवळाली प्रवरा प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासन व व्यापारी संघटना यांची शुक्रवारी सकाळी...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासन व व्यापारी संघटना यांची शुक्रवारी सकाळी संयुक्त बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली असून सदर बैठकीमध्ये शनिवारी जनता कर्फ्यू पाळायचे ठरले आहे. त्यानुसार शनिवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद राहतील तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व अस्थापना सकाळी 7:00 ते सायंकाळी 7:00 या वेळात चालू राहतील असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
व्यापारी व नगर पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्याचा व शनिवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.शनिवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. जे दुकानदार नियमांचे पालन करणार नाही. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई व सात दिवस दुकान सिल करण्यात येउल असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले
नगर पालिका सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, नगरसेवक बाळासाहेब खुरूद, अमोल कदम, मुख्याधिकारी अजित निकत, राहूरी फॅक्टरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गिते, देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास पाटील, उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, सुर्यकांत शिंगी, सुखदेव होले, अशोक गाडेकर, पंकज वाळूंज, युनुस तांबोळी, रुपेश गोलांडे, भाऊसाहेब पठारे , अशोक पठारे, विजय साळुंके, दत्ता गागरे, किरण थोरात, प्रशांत विश्वासराव, राकेश कदम, यांच्या सह व्यापारी उपस्थित होते.
अनलॉकडाऊन नंतर रुग्ण संख्येत वाढ
लाँकडाऊन उघडल्या नंतर पून्हा रुग्ण संख्येत वाढ दिसुन येत आहे. कामानिमित्त बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी कोरोना मुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत