आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशाताई वने - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशाताई वने

वळण/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशाताई भारत वने...

वळण/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशाताई भारत वने यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. 


  आरडगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच कर्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वने यांच्या नावाची सुचना कुसूमताई झुगे यांनी मांडली त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.सदर निवड बिनविरोध झाल्याची ग्रामविकास अधिकारी किसान भिंगारदे यांनी जाहीर केले.सदर बैठकीत जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक जेष्ठ सदस्य सुनिल मोरे,प्रमोद झुगे,सहादुभाऊ झुगे,मंगलताई जाधव,राणी म्हसे उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वने यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी कैलास झुगे,संजय झुगे,कैलास संपत झुगे,दत्तु म्हसे,संदिप जेऊघाले,मोहन खुरूद,साहेबराव जाधव,अनिल मोरे भारत वने,सुनिल इंगळे,आनंद वने आदि उपस्थित होते.जनसेवा मंडळाने आमच्यावर टाकलेली जबाबदारी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांना विचारात घेऊन गावाच्या हिताचे निर्णय घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे यावेळी वने यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत