खा. सदाशिव लोखंडे यांची 'साई प्रवरा'स सदिच्छा भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खा. सदाशिव लोखंडे यांची 'साई प्रवरा'स सदिच्छा भेट

आंबी/वेबटीम:-  नाफेड, महा.एफ.पी.सी व साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अंतर्गत केसापुर येथील कांदा खरेदी व साठवणुक प्रकल्पास शिर्डी लोकसभा ...

आंबी/वेबटीम:- 

नाफेड, महा.एफ.पी.सी व साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अंतर्गत केसापुर येथील कांदा खरेदी व साठवणुक प्रकल्पास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन आढावा घेतला. खा. लोखंडे यांनी चाळीमध्ये साठवलेला कांदा व निवड पद्धतीचे कौतुक केले. साई प्रवरा कंपनीमार्फत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा, याठिकाणी नक्कीच बाजार भावापेक्षा जास्त भाव मिळेल असे आवाहन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले. 

         प्रवरा परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रकल्पाचे स्वागत होत आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी खा. लोखंडे यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

       या प्रसंगी साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या वतीने खा. सदाशिव लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार, उपसरपंच अनिल भगत, चेअरमन संभाजी नांनोर, सचिव दादासाहेब मेहेत्रे, संचालक कुंडलिक खपके, रायभान जाधव, नंदकिशोर मुसमाडे, कार्यकारी संचालक सुनिल साबळे, व्यवस्थापक संतोष मेहेत्रे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कंपनीचे सचिव दादासाहेब मेहेत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


"साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी संचालित कांदा खरेदी व साठवून प्रकल्प पंचक्रोशीसाठी मानबिंदू ठरेल. खा. सदाशिव लोखंडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासले जाईल. याकामी केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार व ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत आहे."- दादासाहेब मेहेत्रे (सचिव - साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत