कोपरगाव शहरातील विकास कामे दर्जेदार व्हावीत- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरातील विकास कामे दर्जेदार व्हावीत- अँड.नितीन पोळ

  कोपरगाव(वेबटीम) गेल्या काही दिवसात कोपरगाव नगर पालिकेने केलेल्या विकास कामे तयार झाल्या नंतर त्या कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या नागरिकां...

 कोपरगाव(वेबटीम)

गेल्या काही दिवसात कोपरगाव नगर पालिकेने केलेल्या विकास कामे तयार झाल्या नंतर त्या कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र त्या कडे नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नुकतीच होऊ घातलेली कामे दर्जेदार व्हावी म्हणून प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरातील जनतेच्या हिताची विकास कामे होत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विकास कामात गुणवत्ता व दर्जा कमालीचा घसरलेला असून ही कामे पूर्ण झाल्या नंतर नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुसकी नगर पालिकेवर आली तर नित्कृष्ठ कामामुळे रस्ते उखडणे, पूल खचने अशा अनेक तक्रारी आल्या असून त्यानंतर तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही नगरपालिका पदाधिकारी, प्रशासन आणि ठेकेदार यांनी या कामाच्या भ्रष्टाचारावर साळसूद पणे पांघरून घालून जनतेच्या तक्रारी कडे डोळेझाक केली 

राजकीय साठमारीत विकास कामे नित्कृष्ठ व दर्जाहीन झाली असून पावसाळा सुरू झाल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेऊन सुरू झालेल्या विकास कामाची सुरुवात झाली असली तरी ही कामे दर्जेदार व चांगली व्हावी म्हणून नगर पालिका प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी नेमून या कामाकडे लक्ष द्यावे व झापडबंद विकास होण्यापेक्षा दर्जेदार कामे व्हावी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी या पत्रकात केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत