कोपरगाव प्रतिनिधी आपला मुलगा अनिल गायकवाड याने कोल्हे परिवाराविरोधात व्यक्त केलेले मत हे अतिशय चुकिचे आहे. यामुळे मला मनस्वी दु:ख झा...
कोपरगाव प्रतिनिधी
आपला मुलगा अनिल गायकवाड याने कोल्हे परिवाराविरोधात व्यक्त केलेले मत हे अतिशय चुकिचे आहे. यामुळे मला मनस्वी दु:ख झाले. त्याला ते बोलण्यास ज्यांनी कोणी भाग पाडले त्यांना खरी वस्तु स्थिती माहितच नाही. आमच्या गायकवाड कुटुंबाच्या प्रत्येक सुख दु:खात कोल्हे परिवार सर्वात आधी हजर असतो आजवर अनेक कठीण प्रसंगात अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम कोल्हे परिवाराने केलेले आहे. आमच्या कुटुंबातील अनेक सदस्य संजीवनीच्या विविध संस्थामध्ये कार्यरत आहेत. अनेक तरुणांना रोजगारास लावण्याचे काम कोल्हे परिवाराने केलेले हे कदाचीत माझ्या मुलाच्या स्मरणात राहिले नसावे. आमच्या कुटुंबाला कोल्हे परिवाराने नेहमी मदतीचा हात दिला मात्र त्याचा कधी गवगवा केला नाही. कुणासाठी काहीतरी चांगले काम करणे या भावनेने हा परिवार इतरांसाठी काम करतो याचे आम्ही अनेक वर्षापासुन साक्षीदार आहोत. गेली 35 वर्षे तालुक्यासाठी कोल्हेंनी काय केले असे विचारणाऱ्यांना गावाच्या मध्यवर्ती चौकात येऊन उत्तर देण्यास आपण सक्षम असल्याचे पत्रक शिवाजी माधवराव गायकवाड यांनी प्रसिद्दीस दिले आहे.
त्यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, एका कार्यकुशल कुटुंबावर राजकीय चिखलफेक करण्यासाठी माझ्या मुलाचा प्यादे म्हणुन कुणी वापर करत असेल व तरीही माझ्या मुलाच्या बुद्धीत प्रकाश पडणार नसेल तर माझ्या एवढा कम नशीबी वडील शोधुन सापडणार नाही. आजपर्यंत गायकवाड कुंटुब हे कोल्हे परिवारा सोबतच होते व यापुढेही सोबतच राहणार हे टिकाकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या मुलांकडुन झालेली चुकी ही मला नेहमीच शल्य देणारी राहिल अतिशय चांगले काम कोल्हे परिवाराने आजवर तालुक्यात केले याची साक्ष अनेक ऐतिहासीक विकासकामे देत आहेत. हि कामे पाहुन मानसीक त्रास होणारी विकृती माझ्या मुलासारख्या अनेकांचा वापर करुन कुटील राजकारण साध्य करण्याच्या गलिच्छ प्रयत्नात आहेत. मात्र त्यांना यातुन काही साध्य होणार नाही व त्यांच्या अश्या निंदणीय कृत्यामुळे कोल्हे परिवारावर प्रेम करणाऱ्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होईल. विनाशकाली विपरीत बुद्धी वापरुन आपला राजकीय स्वार्थ आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलांच्या खांद्यावर बंदुका ठेवुन कोणीही साधू नये अन्यथा त्यांचे राजकीय वस्त्रहरण अटळ आहे हा इशारा सामान्य नागरीक म्हणुनआपण देत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत