गावातील नागरिकांना त्रास देणारा इसम 14 दिवसांसाठी जेल मध्ये.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गावातील नागरिकांना त्रास देणारा इसम 14 दिवसांसाठी जेल मध्ये..

मौजे भोसे, तालुका कर्जत गावातील इसम नामे महेंद्र तुकाराम चव्हाण, वय 31 वर्ष याने भोसे येथील आरोग्य महिला कर्मचारी काही दिवसांपूर्वी कोविड बा...

मौजे भोसे, तालुका कर्जत गावातील इसम नामे महेंद्र तुकाराम चव्हाण, वय 31 वर्ष याने भोसे येथील आरोग्य महिला कर्मचारी काही दिवसांपूर्वी कोविड बाबत व इतर कामकाज करत असताना त्यांना शिवीगाळ दमदाटी केली होती. तसेच हा इसम दारूचे नशेत गावातील नागरिक व महिला यांना मारहाण करणे, शिवीगाळ करतो, गावात नेहमी दहशत निर्माण करतो. यामुळे गावातील जनता भयभीत झाली होती. त्याच्यावर कर्जत पोलिस स्टेशन प्रतिबंधात्मक प्रस्ताव क्रमांक 2/2021 सीआरपीसी 151 (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर इसमास 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यासाठी मा. प्रथम न्यायदंडाधिकारी यांना तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कर्जत यांनी सदर बाबत म्हणणे ऐकून सदर इसमास दिनांक 22.7.2021 पावेतो 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सदर इसमास 14 दिवस स्थानबद्ध करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याने भोसे गावातील जनता समाधानी होऊन जनतेने पोलिसांचे आभार मानले आहे



*सदरची कारवाई-*

मा.पोलीस अधिक्षक सो 

श्री. मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, 

अपर पोलीस अधिक्षक 

श्री सौरभकुमार अग्रवाल, 

उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग 

श्री आण्णासाहेब जाधव 


यांचे मार्गदर्शनाखाली 


कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुनील माळशिखरे, भाऊसाहेब यमगर,विकास चंदन यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत