सामान्य नागरिक अन् व्यापा-यांना ञास दिला तर खबरदार;पो.नि.दुधाळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सामान्य नागरिक अन् व्यापा-यांना ञास दिला तर खबरदार;पो.नि.दुधाळ

  राहुरी तालुक्यातील सामान्य व्यापारी आणि नागरीकांना गुंड प्रवृत्तीच्या लोंकांकडुन त्रास देण्याचे काम कोणी करत असेल तर खपवुन घेतले जाणार नाह...

 राहुरी तालुक्यातील सामान्य व्यापारी आणि नागरीकांना गुंड प्रवृत्तीच्या लोंकांकडुन त्रास देण्याचे काम कोणी करत असेल तर खपवुन घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिला आहे. 

   शनिवारी पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांचा राहुरी तालुका बार असोशियनच्या वतिने सत्कार करण्यात आला. यावेळी असोशियनचे अध्यक्ष सतिष सोनवने, उपाध्यक्ष जयेश मुसमाडे,रावसाहेब मांगुडे,रनजित गाढे,बाळासाहेब मुसमाडे,बाळासाहेब मांगुडे,मच्छिंद्र कराळे,सागर कराळे आदि उपस्थित होते.यावेळी या व्यापा-यांनी आपल्या अडचणींचा पाढाच दुधाळ यांच्या समोर वाचला. गुंडप्रवृत्तीच्या तरुणांकडुन वेळोवेळी त्रास दिला जात आहे.बिले मागितले असता वाद करत हाणामारी करण्याची धमक्या दिल्या जातात.त्यामुळे व्यवसाय करतांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सांगण्यात आल.यावेळी दुधाळ यांनी जर कोणी दमबाजी करत असल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधा अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर  कारवाई करण्यात येईल.आणि तालुक्यात कोणी शांतता भंग केली तर त्यांचाही  बंदोबस्त केला जाईल असा इशारा यावेळी दुधाळ यांनी दिला.यावेळी बार असोशियन च्या पदाधिका-यांनी तालुक्याला असे खमके अधिकारी लाभल्याने समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत