कोपरगावात मालवाहू ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात मालवाहू ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

कोपरगाव/प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार संबंधित प्रशासनास अंमलबजावण...

कोपरगाव/प्रतिनिधी

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार संबंधित प्रशासनास अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. मात्र, वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोपरगाव शहरातही शुक्रवारी (ता.९) पावणे चार वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या चालकाने सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. यावरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील न्यायालय रस्त्यावरील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मालवाहू ट्रक (एमएच.४३, यू.७१११) हा चालक सूरज संजय देवाड (रा.ता.चांदवड, जि. नाशिक) याने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच तोंडाला मास्क न लावता कोविड नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी सहा. फौजदार रमेश जगधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सूरज देवाड याच्या विरोधात गुरनं.२१५/२०२१ भादंवि कलम १८८(२), २८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार आर.एस.कांबळे हे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत