कोपरगाव मुख्यमंत्री व पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना संपर्क अभियान दिनांक १२ जुलै २०२१ ते २४ जुलै २...
कोपरगाव
मुख्यमंत्री व पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना संपर्क अभियान दिनांक १२ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने सर्व आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी,जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, विधानसभा संघटक,शहरप्रमुख,उपशहरप्रमुख,विभागप्रमुख,संघटक,शाखाप्रमुख,गावप्रमुख,गटप्रमुख,युवासेना,वाहतूक सेना,ग्राहक संरक्षण कक्ष, शेतकरी सेना,वैद्यकीय कक्ष,युवती सेना,व्यापारी सेना,रिक्षा सेना, एसटी कामगार सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी,नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य यांनी स्थानिक ठिकाणी बैठक आयोजित करून शिवसेनेचा विचार घरो घरी पोहोचविणे अपेक्षित आहे.
तसेच 'माझे गाव कोरोना मुक्त गाव'अभियान राबविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यात शिवसेना संपर्क अभियाना चा शुभारंभ माननीय नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय खासदार व नुतन साईबाबा संस्थान विश्वस्त सदाशिव लोखंडे साहेब व नगर उत्तर जिल्हाप्रमुख व नूतन साईबाबा संस्थान विश्वस्त श्री रावसाहेब खेवरे पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक १३ जुलै २०२१ वार मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.
तरी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे व शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत