कोपरगावात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत!

कोपरगाव/प्रतिनिधी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी आमदारांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला की नाही याची वि...

कोपरगाव/प्रतिनिधी

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी आमदारांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला की नाही याची विचारणा केली होती. यास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतेच पुराव्यानिशी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी २६ जूनला चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार कोपरगावमध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा कॉर्नर येथे बेकायदेशीररित्या गर्दी जमवून कोरोना नियमाचे उल्लंघन करून आंदोलन केले होते. तसेच नगर-मनमाड महामार्ग अडवून धरल्याबद्दल प्रशासनाने काय कारवाई केली, असा सवाल नगराध्यक्ष वहाडणे यांनी विचारला होता. यावर पोलीस निरीक्षक देसले उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राजकीय पक्षाचे शहराध्यक्ष दत्तात्रय रूपचंद काले यांच्यासह ४७ राजकीय कार्यकर्ते व इतर आठ ते दहा लोकांविरुद्ध त्याच दिवशी सहाय्यक फौजदार संजय पवार यांच्या फिर्यादीवरून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तिकोने हे करत आहे. तरी नगराध्यक्षांनी पूर्ण माहिती घेऊन प्रसिद्धीपत्रक जाहीर करावे, असा सल्ला दिला आहे.

शिवाय कायद्याचे उल्लंघन करणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता असो त्याच्यावर कारवाई ही होणारच. कायदा सर्वांना सारखाच असून प्रशासन त्यांचे काम चोखरित्या करत असल्याचेही पोलीस निरीक्षक देसले यांनी स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत