अहमदनगर प्रतिनिधी- कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांनी कर्जत तालुक्यातील विनापरवाना चालणारे सावकारकी व्यवसाय...
अहमदनगर प्रतिनिधी-
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांनी कर्जत तालुक्यातील विनापरवाना चालणारे सावकारकी व्यवसायबाबत नागरिकांना बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार करा असे आवाहन केल्याने राशीन नजीक राहणारे सचिन विलास पाटिल, रा. काळेवाडी, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर हे दिनांक 26/6/2021रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे आले व त्यांनी सांगितले की मी सुमारे एक वर्षांपूर्वी परीटवाडी येथील एका सावकाराकडून व्यावसायिक कामाकरिता दोघांनी प्रत्येकी 6 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले होते. मी त्या सावकारास वेळेवर व्याज देत होतो परंतु माझ्या पैशाची वेळेत परत फेड न झाल्याने त्या सावकाराने माझे मागे व्याजाचे पैसे आताच पाहिजे असा तगादा लावून माझे मालकीची 15 लाख रुपये किमतीची फॉरचूनर गाडी क्रमांक MH 12KW 0025 ही काही महिन्यांपूर्वी त्याचे पैसे दिले नाही म्हणून बळजबरीने ओढून नेली आहे. मला आता खूप मानसिक त्रास झाला असून मानसिकता खूप बिघडली आज. साहेब माझी तक्रार घ्या व मला न्याय द्या असे भावुक होऊन सचिन पाटील यांनी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांना आपली तक्रार सांगितल्याने लागलीच पोलीस निरीक्षक साहेबानी लागलीच त्यांचे तक्रारीची दखल घेत राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,संपत शिंदे अशांना सदरची हकीकत सांगून तात्काळ त्या सावकारास कर्जत पोलीस स्टेशनमध्ये बोलवा असा तोंडी आदेश केल्याने वरील पोलीस स्टाफ त्या सावकारास पोलीस स्टेशन येथे बोलावून समक्ष हजर केले असता म्हणून मी त्याची गाडी तात्काळ परत करतो असे कळविले आणि सदरची गाडी तात्काळ परत केली.
सदरच्या कारवाईमुळे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव व पोलीस स्टाफचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ,पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे,सागर म्हेत्रे,संपत शिंदे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत