देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात "कोव्हीड" अंतर्गत लसीकरण करण्यात येते.परंतू येथिल कर्मचारी वशिलेबाजी करुन नातेवाईकांसह...
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात "कोव्हीड" अंतर्गत लसीकरण करण्यात येते.परंतू येथिल कर्मचारी वशिलेबाजी करुन नातेवाईकांसह शेजारील व्यक्तींना व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या घरी जावून लसीकरण करणारा "तो" कर्मचारी कोण? लसीकरणा बाबत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या नंतर कदम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आरोग्य अधिकारी सह कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन झाडाझडती घेतली.लसीकरण करायचे असेल तर प्रामाणिकपणे करा नाहीतर करु नका वशिलेबाजी करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतले.नाव नोंदणी प्रमाणे लसीकरण करा नाही तर बंद ठेवा पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असे हि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात "कोव्हीड" लसीकरणाच्या वेळी गोंधळ उडत होता.वेळप्रसंगी हामरीतुमरी वरुन मारहाणी पर्यंत नागरिकांची मजल गेली होती. लसीकरणाचा गोंधळ थांबविण्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांनी लक्ष घालुन पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची यादी पालिकेने घेवून उपलब्ध लसी नुसार यादी करुन त्या लाभार्थ्याला फोनद्वारे संपर्क साधुन लसीकरणाचा दिवस वेळ सांगितला जात आसल्याने लसीकरणातील गोंधळ कमी झाला.पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेच्या आय लव देवळाली या अँपवर नाव नोंदणी केली तरच त्या नागरिकास लसीकरण करण्यात येते.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी लसीकरण चालू झाल्या पासुन वशिलेबाजी करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. या कर्मचाऱ्यांने जवळच्या सर्व नातेवाईक व राहत असलेल्या परीसरातील 18 वर्षापुढील नागरिकांचे वशीलेबाजीणे लसीकरण करुन घेतले आहे.शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी जावून लसीकरण करणारा हा कर्मचारी बुधवारी लसीकरणाच्या वेळी रंगेहाथ पकडला आहे. बुधवारी दुसरा डोसाचे लसीकरण चालू असताना नगर पालिकेने फोन करुन लसीसाठी बोलविलेल्या नागरिकांच्या रांगेत पाच ते सहा 18 ते 20 वयोगटातील तरुण टोकण घेवून रांगेत उभे होते.नगराध्यक्ष कदम यांना शंका आल्याने त्या तरुणांकडे पहिल्या डोसाची नोंद कधी केली होती. तुम्हाला लसीसाठी पालिकेतुन फोन आला का याची विचारणा केली. तेव्हा या तरुणांना पहिला डोस घ्यावायचा आहे.माञ लसीकरणा बाबत कुठे हि नोंदणी केलेली नाही. हे तरुण रांगेत उभे कसे या शंका आली असता अधिक चौकशी केली असता 'त्या' कर्मचाऱ्यांने या तरुणांना लसीसाठी टोकण दिल्याचे तरुणांनी सांगितले. यावेळी माञ नगराध्यक्ष कदम यांचा पारा चढला. वैद्यकिय अधिकाऱ्यांसह 'त्या' कर्मचाऱ्यास समोर बोलावून झाडाझडती घेतली. बाकीचे नागरिक मुर्ख आहेत का नाव नोदंणी करतात. लसीकरणाची देवा सारखी वाट पाहतात.तुम्ही वशिलेबाजी करता. लसीकरण करता येत नसेल तर करु , नका मी पर्यायी व्यवस्था उभी करतो.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील 'या' कर्मचाऱ्या बद्दल नागरिकांकडून तक्रारी येत आहेत.लसीकरणात वशिलेबाजी करुन वरुन शिरजोर होतो. त्याच्यावर वैद्यकिय अधिकारी यांनी कारवाई न केल्यास वरीष्ठांच्या कानावर हा प्रकार घालण्यात येईल. मंगळवारी सकाळी वैद्यकिय अधिकारी व त्या कर्मचाऱ्या मध्ये लसीकरणातुन शाब्दीक चकमक उडाली असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष कदम यांच्या कानात सांगितले. लसीकरणासाठी आय लव देवळाली या अँपवर नाव नोंदवावे किंवा नगर पालिकेत आधार कार्डाद्वारे स्वतः नाव नोंदणी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष कदम यांनी केले.यापुढे पालिकेतील यादी प्रमाणेच लसीकरण करण्यास वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत