संजीवनी साखर कारखाना इतर साखर कारखानदारीस प्रेरणादायी ठरेल -साखर आयुक्त शेखर गायकवाड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संजीवनी साखर कारखाना इतर साखर कारखानदारीस प्रेरणादायी ठरेल -साखर आयुक्त शेखर गायकवाड

  सध्याच्या परिस्थितीत आत्मनिर्भरतेची परिभाषा साखर उदयोगांने आत्मसात करून त्यानुरूप पावले टाकुन यशोशिखर गाठावे. सध्याचा काळ स्पर्धेचा आहे त्...

 


सध्याच्या परिस्थितीत आत्मनिर्भरतेची परिभाषा साखर उदयोगांने आत्मसात करून त्यानुरूप पावले टाकुन यशोशिखर गाठावे. सध्याचा काळ स्पर्धेचा आहे त्यात सहकारात जे निवडक २५ कारखाने तेजाने चमकत राहतील त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्यांचे नांव अग्रभागी राहिल, साखर, रासायनिक उपपदार्थ निर्मीती, इथेनाॅल याबरोबरच पॅरासिटामाॅल औषधी उत्पादनांत संजीवनीने जी सुरूवात केली ती सहकारी व खाजगी कारखानदारीला निश्चित प्रेरणादायी राहिल असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांने पॅरासिटामाॅल या औषध निर्माण प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले त्याच्या अद्यावत फार्मा डिव्हीजन रिसर्च व डेव्हलपमेंट प्रयोगशाळेचे उदघाटन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते व अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते.  प्रारंभी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कारखान्यांच्या प्रगतीचा आढावा देत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या अनुभवी मार्गदर्शनांतुन 25 वर्शापुर्वीच आत्मनिर्भरतेची शिकवण संजीवनीला मिळत असुन त्या ज्ञानाच्या जोरावर आणि सभासद शेतक-यांच्या सहकार्यातुन नव नविनि प्रकल्प साकारून ते यशस्वी करण्यांवर व्यवस्थापन मंडळाचा भर आहे. तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी साखर, रासायनिक उपपदार्थ, सहवीज निर्मीती, बायोगॅस, सॅनिटायझर , इथेनाॅल आणि पॅरासिटामाॅल औषध निर्मीती संदर्भात दोन तास सचित्र सादरीकरण केले त्यातील सर्व बारकावे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी समजुन घेत काही ठिकाणी मार्गदर्शन दिले.   उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सर्वश्री अरूणराव येवले, मनेश गाडे, अशोक औताडे, राजेंद्र कोळपे, विलास वाबळे, शिवाजीराव वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, भास्करराव भिंगारे, फकिरराव बोरनारे, सोपानराव पानगव्हाणे, वेणुनाथ बोळीज, बाळासाहेब नरोडे, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक            शिवाजीराव दिवटे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव आदिंनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वागत केले. तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते कारखान्यांच्यावतींने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक मिलींद भालेराव, विशेष लेखापरिक्षक राजेंद्र देशमुख, संजिवनी फार्मा रिसर्चचे प्रमुख डाॅ. वाघ, अदिरथ वाघ, सहसंचालक श्री. जोशी यांचा सत्कार करण्यांत आला.


श्री. शेखर गायकवाड पुढे म्हणांले की, शेतक-यांना शाश्वत उत्पादन उस शेतीतुन मिळु लागल्यांने 88 हजार हेक्टर क्षेत्र नव्यांने उस लागवडीखाली आले असुन साखर उद्योगाचा टर्न ओव्हर 50 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. गेल्या दोन हंगामात एफआरपीच्या माध्यमांतुन 32 हजार कोटी रूपये शेतक-यांच्या खिशात पडले आहेत.  माजीमंत्री शंकरराव कोल्हे व अभ्यासु व्यक्तीमत्व बिपीनदादा कोल्हे यांनी सहकारात नवनविन पायलट प्रकल्प आणून ते    

  यशस्वी केले आहेत. सहकारी साखर कारखानदारीला नवि दिशा देण्यांचे काम संजीवनीतुन होते.  येथील शिकवण -ज्ञान आपल्याला अन्य ठिकाणी निश्चितच उपयोगी पडते.  सहकाराला इतरांशी स्पर्धा करतांना नव नविन बदल आत्मसात करून पुढे जावे लागेल, पैसे मिळविण्यांसाठी दुस-यांच्या दारात गेल्याशिवाय मार्ग सापडणार नाही,  जे काळानुरूप बदल करतील त्याच साखर कारखान्यांचे भवितव्य उज्वल असेल.  सहकारमहर्शि शंकरराव कोल्हे कारखान्यांने औषध निर्मीती प्रकल्प सुरू करून जी धोरणे अंगीकारली ती निश्चितच इतरांना प्रेरक व दिशादर्शक राहिल. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत