कोपरगाव/वेबटीम :- कोरोना काळात लॉकडाऊन झाले आणि अनेक व्यवसाय ठप्प झाले,काहींच्या नोकऱ्या गेल्या अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले.अश...
कोपरगाव/वेबटीम :- कोरोना काळात लॉकडाऊन झाले आणि अनेक व्यवसाय ठप्प झाले,काहींच्या नोकऱ्या गेल्या अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले.अशा परिस्थिती अनेकांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी व पोटाचा खळगा भरण्यासाठी हाताला मिळेत ते काम करू लागले आणि आपला उदरनिर्वाह करू लागले.त्यात अनेक हॉटेल कामगारांवर देखील अशीच काहीसी परिस्थितीला सामोरे जावे लागले.
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आणि सर्व पूर्व पदावर हळूहळू येऊ लागले दि.२५ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
कोपरगाव शहरात देखील नियमावलीचे काटेकोर पणे पालन करत दैनंदिन जीवन काही प्रमाणात सुरु देखील झाले आहे.शहरात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आस्थापने,हॉटेल,शॉप,भाजीपाला विक्री व इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकाना देखील ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल व रेस्टॉरंट खुले ठेवण्यास मुभा दिली असून दुपारी ४ वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा देण्याकरिता सवलत दिली गेले आहे. हॉटेल व बार रेस्टॉरंट व्यावसाईकानी लाखो रुपये खरच करून व्यवसाय थाटला असून कोरोना काळात हॉटेल बंद असल्यमुळे गेल्या एक दीड वर्षापासून आर्थिक संकटाला हॉटेल चालक थोंड देत आहे.हॉटेल बंद असल्यामुळे अनेक हॉटेल कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.तर काही हॉटेल चालकांनी दरमहा कामगारांना आर्थिक मदत देखील देऊ केली होती.प्रशासनाने हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायीकाना सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा दिली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत धंदा होते नसल्याने व अन्नावर केलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शहरात ४ वाजे नंतर सुद्धा काही हॉटेल चालक छुप्या पद्धतीने बाहेरून शटर बंद करून मागच्या दाराने नायलाजाने हॉटेल सुरु ठेऊन व्यवसाय करत असल्याचे निदर्शनात येत आहे.खऱ्या अर्थाने या हॉटेल व्यावसायिकांचा धंदा दुपारी ४ नंतरच होत असल्याचे काही हॉटेल चालकाकडून समजते.एका हॉटेल वर जवळपास अंदाजे १० ते ३० परिवाराचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने प्रशासनाने सर्व हॉटेल व्यावसाईकाना नियमाचे पालन करत रात्री ९ वाजेपर्यंत सवलत द्यावी अशी मागणी हॉटेल चालकांकडून होत आहे.तरी प्रशासनाने या हॉटेल चालकांच्या मागणीला नवे तर त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबांचा त्यांच्या उदरनिर्वाहचा विचार करून हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीला सवलत द्यावी अशी मागणी कोपरगाव शहर हॉटेल व्यावसाईक करत आहे.तरी या हॉटेल व्यावसायिकांनाच्या मागणीचा विचार शासन दरबारी केला जाणार कि नाही याकडे हॉटेल चालकांचे लक्ष लागून आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत