मोरवाडी येथे महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोरवाडी येथे महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण

  राहुरी रस्त्यावर नळ्या टाकू नका असे म्हंटल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील महिलेस लथाबुक्यांनी मारहाण केल्याप्...

 राहुरी

रस्त्यावर नळ्या टाकू नका असे म्हंटल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील महिलेस लथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टाकळीमिया मोरवाडी येथील सुनीता ज्ञानदेव मोरे(वय ४०) यांनी १७ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास तुम्ही घरासमोर नळ्या टाकू नका असे सोन्याबापू रंगनाथ मोरे, मच्छिंद्र सोन्याबापू मोरे, गीताराम सोन्याबापू मोरे यांना म्हंटल्या असता त्याचा राग आल्याने सुनीता मोरे यांना तिघांनी लथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यास करत जीवे मारण्याची धमकी दिली.

 याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सुनीता मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत