१५ वर्षापासून अतिक्रमणीत असलेल्या रस्ताने दोन दिवसात घेतला मोकळा श्वास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

१५ वर्षापासून अतिक्रमणीत असलेल्या रस्ताने दोन दिवसात घेतला मोकळा श्वास

वळण/प्रतिनिधी       राहुरी तालुक्यातील वळण येथील राजदेव वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने तब्बल पंधरा वर्षानंतर प्रथमच मोकळा श्वास घेतला आ...

वळण/प्रतिनिधी


      राहुरी तालुक्यातील वळण येथील राजदेव वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने तब्बल पंधरा वर्षानंतर प्रथमच मोकळा श्वास घेतला आहे.या रस्त्याच्या बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष ,माजी उपसरपंच आणि तरुणांच्या पुढाकाराने या रस्ताचे जेसीबी च्या साह्याने दोन दिवसात अतिक्रमण काढुन हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

          वळण येथील राहुरी-मांजरी या रस्त्यापासून राजदेव वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे अस्तित्व संपुष्टाकडे चालले होते. वाहनधारकांना मोठी कसरत,वाहने काढण्यास त्रास सहन करावा लागत होता. पूर्वीप्रमाणे लहान, मोठी वहाने सहज जाऊ शकेल असा रस्ता हवा म्हणून परिसरातील ग्रामस्थ वारंवार मागणी करत होते. पण अनेकदा प्रयत्न करूनही याला यश आले नव्हते बुधवारी मात्र माजी तंटामुक्त अध्यक्ष कारभारी खुळे, माजी उपसरपंच बाबा खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लाभधारक शेतकरी व  तरूणांना एकत्र करत सर्वांनी आप आपले अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले.त्यामुळे हा रस्ता तात्काळ मोकळा होऊ झाला .

 यावेळी ऋषिकेश आढाव, गोविंद आढाव, प्रकाश आढाव, आप्पासाहेब खुळे, जालिंदर गडाख, रविंद्र मच्छिंद्र आढाव, रवींद्र विष्णू आढाव, भाऊसाहेब आढाव, शैनेश्वर खुळे, बाळासाहेब आढाव, गणेश राजदेव,धनंजय आढाव, अनिल राजदेव, दिगंबर आढाव, बाबासाहेब डमाळे , हबुपठाण,आप्पासाहेब खुळे, शनैश्वर खुळे, बाळासाहेब देशमुख,  आदींनी सहकार्य केले. आणि पंधरा वर्षा पासून अतिक्रमणात अडकलेला रस्ता अवघ्या दोन तासात मोकळा झाला .त्यामुळे सर्वांनीच आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत