डॉ.किरण होन यांना बी.डी.एस पदवी प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.किरण होन यांना बी.डी.एस पदवी प्रदान

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आणी कोपरगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर शांतीलाल भास्कर होन यांच्...



कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आणी कोपरगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर शांतीलाल भास्कर होन यांच्या सुष्ना डॉ किरण साईनाथ होन यांनी नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील बि.डी.एस.ही पदवी संपादीत केली आहे.

श्री.अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल कॉलेज येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत ही पदवी मिळवली आहे.लग्नानंतरही सासरे माजी सैनिक शांतीलाल होन व वडील सुभाषराव जाधव यांनी  त्यांना प्रेरणा दिली व त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.


पती साईनाथ होन पुण्यात व्यवसायिक असून त्यांनी पत्नीच्या शिक्षणासाठी मेहनत घेत पत्नी ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.डॉक्टर किरण होन यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे महंत रमेशगिरी महाराज, जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण,माजी सभापती अनुसयाताई होन, चांदेकसारे ,डाऊच खुर्द,  घारी,पानमळा ,जेऊर कुंभारी , या भागातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत