कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुलदादा टेके पाटील चेरिटेबल ट्रस्ट व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्...
कोपरगाव
तालुक्यातील वारी येथील राहुलदादा टेके पाटील चेरिटेबल ट्रस्ट व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ शाळेच्या प्रांगणात वटवृक्ष, कडूलिंब, चिंच, भेंडी, गुलमोहराचे वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वृक्षप्रेमी असलेल्या स्व. राहुल टेके यांचा वृक्षारोपणाचा व संवर्धनाचा वारसा त्यांचा मित्रपरिवार व कुटुंबीय त्यांच्या स्मरणार्थ सुरु ठेवत आहेत. हि निश्चित गावच्या नैसर्गिक सौंदर्य वाढीसह निसर्ग संवर्धनासाठी महत्व पूर्ण बाब आहे. त्यामुळे या झाडांच्या माद्यमातून त्यांच्या स्मृती सदैव आपल्यात राहणार आहे. आणि त्यांना हीच खरी आदरांजली असणार आहे. असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या वृक्षारोपणासाठी कोपरगावचे सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, केंद्रप्रमुख किशोर निळे, वारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वरद गर्जे, शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव कराळे, सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकर टेके, सुदाम टेके, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, सेक्रेटरी अशोक निळे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, प्रकाश गोर्डे, सुवर्णा गजभिव, विवेक टेके, रामराव पाटील, सतीश शेटे, ताराचंद पडघडमल, 'लोकमत" चे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार फकीर टेके, बच्चू गायकवाड, गौतम डोशी, अशोक गजभिव, सतीश मैराळ, गणेश भाटी, अशोक बोर्डे, भास्करराव आदमने, पंडित वीर, चंद्रकांत पाटील, भरत गंगुले, अंगणवाडी सेविका शकुंतला टेके, तारामती टेके, वर्षा लकारे, अलका मेहेरे, छाया कोरके, कल्पना निळे, सारिका भड, विशाखा भालेराव, नूतन येशी,ज्योती टिक्कल, आशासेविका रोहिणी लोखंडे, योगिता पवार, शीतल गायकवाड, सविता वाघ, मदतनीस सुनीता जाधव, वैशाली सोनवणे, मनीषा महापुरे, कल्पना मोरे, शीतल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षारोपण यशस्वीतेसाठी छाया वडनेरे, दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे, प्रमोद दारकुंडे, निवृत्ती गोडे शिक्षकासह सुरज टेके, स्वप्नील टेके, बिपीन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत