देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियना अंतर्गत एक व्यक्ती एक झाड लावण्याचे उदिष्ट जिल्हाधिकारी यांनी दिले असुन नगर पालिकेने...
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियना अंतर्गत एक व्यक्ती एक झाड लावण्याचे उदिष्ट जिल्हाधिकारी यांनी दिले असुन नगर पालिकेने आता विस हजार झाले लावण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. पहिल्याच दिवशी 500 झाडे लावून वृक्षारोपनास पारंभ केला आहे.प्रत्येक नागरिकास फळ झाडांचे रोपे देण्यात येणार आहे.नागरिकांनी वृक्षरोपन कार्यक्रमात सहभागी होवून वृक्षारोपन करावे.
नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा अमरधाम लगत असलेल्या मोकळ्या जागेत शनिवारी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना मुख्याधिकारी अजित निकत यांनी सोबत घेवून 500 झाडांचे रोपन करण्यात आले.अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान करुन अवघ्या 10 ते 15 कर्मचारी व अधिकारी वर्गाने चार ते पाच तासात 500 झाडांचे वृक्षारोपन केले. देवळाली प्रवरा नगर पालिकेची लोकसंख्या सुमारे 40 हजार असुन 40 हजार वृक्षारोपन करण्याचे उदिष्ठ जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यानुसार पालिकेने 20 हजार झाडांचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपनाचे उदिष्ठ हाती घेतले आहे. प्रत्येक नागरीकास एक फळाचे रोप देण्यात येणार आहे. नागरिकाने रोपाचे संर्वधन करुन माझी वसुंधरा अभियनात सहभागी व्हावे आसे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.
नगर पालिकेने मोकळ्या व शासकीय जागेत 20 हजार झाडे मियावाकी पद्धतीने लावण्याचे उदिष्ट हाती घेतले आहे. शनिवारी वृक्षारोपन अभियनात मुख्याधिकारी अजित निकत यांनी स्वतः श्रमदान करुन वृक्षारोपन केले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी स्वतः वृक्षारोपन कार्यक्रमात झोकुन देवून काम करीत असताना दिसत होते. 20 हजार झाडे नागरिकांनी लावायचे आहे. नागरिकांना फळ झाडे देण्यात येणार आहे.वृक्षारोपन कार्यक्रमातुन माझी वसुंधरा अभियान सहभाग नोंदवयाचा आहे.
या अभियनात मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके,बांधकाम अभियंता सुरेश मोटे, प्रशासन विभाग प्रमुख विश्वनाथ भांगरे, वृक्षारोपन विभाग प्रमुख मुकुंद मुसमाडे, वाचनालय विभाग प्रमुख संभाजी वाळके, भास्कर जाधव, राजेंद्र हारगुडे, अशोक मुसमाडे, आब्दुल शेख, निळकंठ लगे, सुदाम कडू, महमंद शेख, अक्षय भालेकर, गोरक्षनाथ भांगरे, अन्सार पठाण, राजेंद्र कदम, भारत साळुंखे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत