देवळाली प्रवराच्या तिघांसह १४ आरोपींना पकडले. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या तिघांसह १४ आरोपींना पकडले.

  देवळाली प्रवरा  नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यांमध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांनी गावठी कट्ट्याचा वापर केला असल्या...

 देवळाली प्रवरा

 नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यांमध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांनी गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचे दिसून आले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने श्रीरामपुर, नेवासा, राहुरी मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून 81 ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्रांचा शोध घेत कारवाई केली. 

       या कारवाईमध्ये 7 गावठी कट्टे ,8 जिवंत काडतुसे ,3 तलवारी असा एकूण 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.तीन तालुक्यात केलेल्या कारवाईमध्ये एकूण 14 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. 


       सदर कारवाईमध्ये १)आकाश उर्फ देवात जालिंदर लष्करे रा.नेवासा फाटा, नेवासा २)रुपेश पुनमचंद साळवे रा.मुक्तापुर, नेवासा ३)शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले, नेवासा ४)लक्ष्मण साधू अडांगळे रा. गंगानगर, नेवासा ५)शाहरुख निमेश पटेल रा.संजय नगर, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर ६)अनिल बाळू मिरजे रा.देवळाली, राहुरी ७)कैलास रामू धोत्रे रा.देवळाली, राहुरी ८)काशिनाथ बबन शिंदे रा.वैदुवाडी, सावेडी, नगर ९)शाहरुख ऊर्फ चाटया जावेद शेख रा.घोडेगाव, नेवासा १०)अनिल कचरू साळुंखे रा.गंगापूर, औरंगाबाद ११) मयूर दीपक तावर रा.वार्ड नंबर 3, श्रीरामपूर १२)नागेश पाराजी जाधव रा.देवळाली, राहुरी १३)सिद्धार्थ अशोक पठारे रा.गंगापूर, औरंगाबाद आणि एक अल्पवयीन आरोपी यांना जेरबंद करण्यात आले आहे. 

       या कारवाईसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले होते. पकडलेल्या काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.

         पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय अहमदनगर येथील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरीत्या सदरची कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत