कोपरगाव/प्रतिनिधी आदिवासी प्रवर्गातील महादेव कोळी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही किंवा मिळण्यास स...
कोपरगाव/प्रतिनिधी
आदिवासी प्रवर्गातील महादेव कोळी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही किंवा मिळण्यास समस्या येतात. याबाबत आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शीतल चव्हाण यांनी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदर पत्रात सामाजिक कार्यकर्त्या शीतल चव्हाण यांनी म्हटले आहे की, आदिवासी प्रवर्गातील महादेव कोळी समाजातील नागरिकांना आदिवासी म्हणून मान्यता असतानाही जात प्रमाणपत्र मिळत नाही. तसेच जात वैधत प्रमाणपत्र देखील मिळणे मुश्किल होते. यामुळे अनेकांना नोकरी व शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील प्रमाणपत्राअभावी घेता येत नाही. यासाठी अनेकदा आंदोलने केली.
तरी देखील शासन दुर्लक्ष करत आहे. आता आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तडीस न्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पत्रातून करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत