राहुरी फॅक्टरी राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरात व अंबिका नगर येथे देशी व गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी मुद्देम...
राहुरी फॅक्टरी
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरात व अंबिका नगर येथे देशी व गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
श्रीरामपूर रोड वरील सर्व्हिस स्टेशनच्या कडेला अमोल बबनराव धोंडे ही व्यक्ती देशी भिंगरी दारू विक्री विकताना आढळून आली. ठिकाणी पोलीस पोहोचताच अमोल धोंडे याने पळ काढला. मात्र पोलिसांनी ६०० रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे.
अंबिका नगर येथे परिगाबाई आनंद साळुंखे ही महिला आपल्या घराच्या आडोशाला १ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना मिळून आली आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, तुषार धाकराव, पोलीस नाईक विठ्ठल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भिसे, यांच्या पथकाने ही कारवाई केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत