देवळाली प्रवरा प्रतिनिधी देवळाली प्रवरा येथिल घरफोड्यावरुन पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी देवळाली प्रवरा पोलीस चौकीच्या पोलीसांच...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथिल घरफोड्यावरुन पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी देवळाली प्रवरा पोलीस चौकीच्या पोलीसांच्या बदल्या केल्या.परंतू यातील दोन पोलीसांनी पोलीस चौकीत पुन्हा आम्हीच हजर होणार अशा पैज लावल्या आहेत. हे दोन्ही पोलीस राजकीय हस्तका व अवैध धंदे चालकांच्या मार्फत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर दबाव तंञाचा वापर सुरु केला आहे. मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल आणि चौकीवर पुन्हा प्रस्थ निर्माण करण्याच्या पैजा लागल्या आहेत.
देवळाली प्रवरा येथे दहा ते पंधरा जणाच्या टोळक्याने घरफोड्या केल्या. आ.कानडे यांनी 32 गावांच्या आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ.कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाली.पोलीस निरीक्षक दुधाळ बैठक सोडुन निघून गेले. आ.कानडे यांनी पोलीस उपअधिक्षक मिटके यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेवून मिटके यांनी शुक्रवारी दि.23 रोजी दुपारी आदेश काढुन बदल्या केल्या. यातील दोघे पोलीस देवळाली प्रवरा पोलीस चौकी म्हणजे आपली जाहांगिरी असल्याचे भासवत आहेत. यातील एक पोलीस अनेक वर्षा पासुन याच ठिकाणी कार्यरत असुन गुन्हा दाखल करण्या ऐवजी सेटलमेंट करण्यावर भर देण्यात पटाईत होता. त्याच बरोबार औरंगाबाद येथिल एका गुन्ह्यातील फरार आरोपीस हि या पोलीसाकडून मोलाची मदत केली जात होती. त्या बदल्यात मोठा मोबदला मिळत होता.
देवळाली प्रवरा पोलीस चौकीवर या दोन्ही पोलीसांनी आपले प्रस्थ बसवले होते.एक पोलीस अवैध धंदे चालकांना पैशाच्या मोबदल्यात संरक्षण पुरवित होता. त्याच बरोबर गुन्हे शाखा किंवा राहुरी पोलीसांची रेड पडणार असेल तर त्याची माहिती हि पुरविण्याचे काम करीत होता.तर दुसरा पोलीस वाळूवाल्याच्या मागावर राहुन नविन गाडी कोणती चालू झाली तिचा पाठलाग करुन मासिक हप्ता दिल्या शिवाय वाळू गाडी चालवता येणार नाही.हे दोघे अवैध धंदे चालकांकडून व फिर्याद दाखल करणाऱ्या व्यक्ती कडून व ज्यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली त्यांची समक्ष भेट घेवून मोठी तोडपाणी करायचे मनाजोगती तोडपाणी केली नाही की, त्यांना जेलची हवा खायला लावायची असा कारभार येथिल ते दोन पोलीस करीत होते.
शहरातील दोन्ही राजकीय गटात यांनी संपर्क करुन ठेवला असल्याने. एका गटाने कुरघोडी केली तर दुसऱ्या गटाचा आधार घेवून अधिकाऱ्याचा राग शांत करण्याचे सोईस्कर काम केले जात होते. या दोन पोलीसांना पुन्हा देवळाली चौकीत आणण्यासाठी पैजा लागल्या आहेत. यातील एक पोलीस नव्याने हजर झालेल्या पोलीसांना तुम्ही नारळ घेण्यास तयार रहा. मी पुन्हा येत आहे. हि पोलीस चौकी माझी जहागिरी आहे. माझ्या शिवाय येथे कोणीही काम करु शकत नाही. आम्ही दोघे ही पुन्हा येणार.... पुन्हा येणारच.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत