राहुरी/गोविंद फुणगे :- राहुरी खुर्द परीसरात घरफोडी करणारे फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिस पथकाने मुद्देमालासह पकडले असुन त...
राहुरी/गोविंद फुणगे :-
राहुरी खुर्द परीसरात घरफोडी करणारे फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिस पथकाने मुद्देमालासह पकडले असुन त्यांना गजाआड करण्यात आले आहे. धनराज सुरेश केदारी(रा.राहुरी खुर्द) आणि सुनील साहेबराव माळी(रा.राहुरी खुर्द) या दोघांना जेरबंद करण्यात आले.
राहुरी पो.स्टे हद्दीमधे २१ जुलै रोजी पृथ्वी चंद्रशेखर बिवाल यांच्या फिर्यादी नुसार त्यांच्या रहात्या घराचा कडी-कोंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी दागिने,मोबाईल,कपडे आणि किराणा माल असा ४८,५०० रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५७६\ २०२१ भादवि कलम ४५७, ३८० नुसार अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेतला असता राहुरी खुर्द परिसरातच आरोपी दबा धरून बसले असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने या संयुक्त पथकाने छापा टाकला असता हे आरोपी मिळुन आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके व राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर चौधरी,संदिप पवार,योगेश सातपुते, कमलेश पाथरूड,शिवाजी ढाकणे,लक्ष्मण खोकले,रनजित जाधव,अजिनाथ पाखरे,सचिन ताजने आदिंच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत