कत्तलीसाठी एका वाहनात घेऊन चाललेल्या ५ गायांची कर्जत पोलिसांनी सुटका केली असून ४ लाख रुपयांच्या मुद्देमालासह एकास ताब्यात घेतले आहे. ...
कत्तलीसाठी एका वाहनात घेऊन चाललेल्या ५ गायांची कर्जत पोलिसांनी सुटका केली असून ४ लाख रुपयांच्या मुद्देमालासह एकास ताब्यात घेतले आहे.
कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि जवान हे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना श्रीगोंदा ते जामखेड जाणारे रोडवर पिर फाटा तालुका कर्जत येथे एक महिंद्रा बोलेरो गाडी येताना दिसली. त्या गाडीस थांबवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तूफेल इसाक शेख, (वय 22 वर्षे, रा.खडकत, तालुका आष्टी, जिल्हा बीड) असे सांगितले. सदर गाडी मध्ये काय आहे अशी चौकशी केली असता त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही म्हणून पोलिसांनी सदर गाडीची पाहणी केली. त्यात ५ खिल्लारी जातीच्या गाई दिसल्या. अधिक सखोल विचारपूस केली असता सदरच्या 5 खिलार गायी या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेवर कर्जत पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयपणे वागविणे आणि प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले. 300,000 रुपये किमतीचा पीकअप आणि 1,00,000 रु किमतीच्या गायी असा गायींसह 4,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश माने पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम, सुनील खैरे, श्याम जाधव, मनोज लातूरकर, महिला पोलीस जवान राणी पुरी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत