'त्या' आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा आरपीआयचा राहुरी तहसीलवर मोर्चा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'त्या' आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा आरपीआयचा राहुरी तहसीलवर मोर्चा

  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य  केल्याने सदर आमदारावर ॲट...



  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य  केल्याने सदर आमदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा राहुरी तालुक्यातील खडांबे येथील अॅक्ट्रासिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तात्काळ अटक करावी तसेच राहता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावी आदी मागणीसाठी राहुरी तहसीलवर आरपीआयच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या तरुण दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.सदर प्रकार अंत्यंत गंभीर असुनदेखील तेथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथवणीखोर वक्तव्य करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा मोर्चा आरपीआय च्या वतीने  या आमदारांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यावरावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येथील असा इशारा देखील  आंदोलन करत्यांनी दिला आला आहे.

     याप्रसंगी आंदोलन कर्तांनी आपल्या मागण्याचे निवेदन डिवायएसपी संदिप मिटके,तहसीलदार फसियोद्दीन शेख,पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे दिले.याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,तालुका अध्यक्ष,विलास साळवे, बाळासाहेब जाधव विजय वाकचौरे ,श्रावण वाघमारे, सिमा बोरूडे,स्नेहल सगळगिळे,रमेश गायकवाड,गोविंद दिवे,सचिन साळवे,,दत्ताञय भोसले आदींसह भिमसैनिक उपस्थित होते.

खऱ्याला खरे म्हणा ; सुरेंद्र थोरात

      सदर मोर्चामध्ये राहुरी तालुक्यातील खडांबे येथील आरोपी यांना देखील तात्काळ अटक करावी अशी मागणी आरपीआयच्या वतीने या मोर्चात करण्यात आली आहे.त्यामुळे आमच्या आंदोलनाला त्यांनी देखील पाठिंबा देऊन या ठिकाणी येणे गरजेचे होते. मात्र खर्‍याला खरं म्हणा असे आवाहन देखील यावेळी सुरेंद्र थोरात यांनी संबंधितांना केले आहे.त्यामुळे पोलिसांवर आरोप करणा-या काही व्यक्ती खडांबे प्रकरणात काय साध्य करू पहात आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत