मुख्याध्यापक सुर्यवंशी यांच्या सेवापुर्तीनिमित्त सावता माळी युवक संघा तर्फे वृक्षरोपण व सँनीटायझर वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुख्याध्यापक सुर्यवंशी यांच्या सेवापुर्तीनिमित्त सावता माळी युवक संघा तर्फे वृक्षरोपण व सँनीटायझर वाटप

 श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरीचे माध्य.मुख्याध्यापक श्री जगन्नाथ विठ्ठल सुर्यवंशी सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून श्र...


 श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरीचे माध्य.मुख्याध्यापक श्री जगन्नाथ विठ्ठल सुर्यवंशी सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व संघटनेचे राज्य सचिव सुनिल गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी केलेल्या वृक्षलागवडीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देत संघटनेच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली.  


तसेच या सेवापूर्ती सोहळ्या निमित्ताने  संघटनेचे कार्यकर्ते उद्योजक मा. हर्षल राऊत यांच्यावतीने उपस्थित सर्वांना सॕनीटायझर वाटत करण्यात आले. 

 या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी राहुरी नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्षा डॉ. सौ.उषाताई तनपुरे,  विद्यमान नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, गाडगे महाराज आश्रमशाळेच्या संचालीका सौ भारतीताई खांडवे-खिलारी,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड, अ. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, राज्य सोशल मिडीयाप्रमुख दिपक साखरे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे , अजिंक्य मेहेत्रे, राहुरी कार्याध्यक्ष अक्षय गुलदगड, मीडिया प्रमुख ओकांर डागवाले, संघटक तेजस राऊत, स्वप्नील भास्कर, आनंद गोंधळे, दिपक गुलदगड, व प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे यांनी परीश्रम घेतले.


या कार्यक्रमासाठी मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष माधुरीताई उदावंत , पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी साहेब,विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर आश्रम शाळेचे भानसहिवरेचे संचालक गणेश खांडवे,अविनाश इंगळे, अंबादास उंडे,सुदाम दिघे,किरण पवार, श्रीमती निलीमा व्यवहारे,श्रीमती छाया लोंढे, जेष्ठ शिक्षक मिलींद गुजरे,निलेश कमखेडेकर,अधिक्षक अजाबराव गोळे,अधिक्षिका श्रीमती आरती लाड,व इतर शिक्षक व शिक्षकेतर आदी उपस्थित होते.  श्री गाडगे महाराज माध्य. आश्रमशाळा राहुरीचे मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी सरांच्या सेवापूर्ती निमित्त संघटनेने केलेल्या वृक्षलागवड व सॕनिटायझर वाटप या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

 तसेच सर्वांनीच या प्रमाणे वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणास  हातभार लावावा असे आवाहन श्री.  संत सावता माळी युवक संघा तर्फे करण्यात आले आहे.

      यावेळी सुर्यवंशी सर हे मनोगत व्यक्त करतांना अत्यंत भावुक  झाले होते.त्यांनी सर्वांचे व संघाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत