कोपरगाव - या कोरोना महामारीत पर्यावरण शुद्धतेचे महत्त्व हे आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे समजले असून यासाठी या सृष्टीचा एक अविभाज्य...
कोपरगाव -
या कोरोना महामारीत पर्यावरण शुद्धतेचे महत्त्व हे आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे समजले असून यासाठी या सृष्टीचा एक अविभाज्य घटक या नात्याने आपल्याला प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व गोदामाई प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त गोदावरी नदीच्या किनारी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानचे मठाधीपती परम पूज्य राघवेश्वरनंदगिरी जी महाराज यांच्या शुभ आशीर्वाद वाणीतुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष के.जे. एस कॉलेज चे चेअरमन अशोक रोहमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री मयुरी कापडणे,कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व सर्व गोदामाई प्रतिष्ठान चे सदस्य, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी सुनील गोर्डे, के.जे.एस कॉलेजचे विश्वस्त संदीप रोमारे, कॉलेजचे प्राचार्य बी एस यादव, नमामी गोदा नाशिकचे राजेश पंडित, सिन्नर येथील वन प्रस्थ संस्थेचे सर्व पदाधिकारी, परिसरातील पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
यावेळी उदगीरकर यांनी सांगितले की आपल्या शरीरातील पर्यावरण शुद्ध ठेवण्याचे काम हे आपले विचार आचार करतात परंतु बाहेरचे चे पर्यावरण शुद्ध ठेवण्याचे काम झाडे करत असतात. आणि हेच पर्यावरण शुद्ध राहिले तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकू यासाठी या भूतलावर आपण देखील एक दृष्टीचा घटक आहे ही संकल्पना डोक्यात रुजवून प्रत्येकाने एका देशी झाडाचे रोपण करून त्याचे आपल्या मुला प्रमाणे संगोपन करणे गरजेचे आहे. असे आवाहन उदगीरकर यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष ढाकणे यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या चार वर्षापासून कोपरगाव शहरातून वाहणारी गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे अविरत कार्य गोदामाई प्रतिष्ठान करत आहे. या कोरोनाचा महामारीत ऑक्सिजनच्या अभावी भरपूर निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून येणाऱ्या काळात असे संकट ओढवले तर मनुष्याला ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमविण्याची वेळ येऊ नये यासाठी नैसर्गिक प्राणवायू वाढविण्या करता आपण सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे असल्याने त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता दिनाचे औचित्य साधत आपल्या सर्वांच्या उपस्थितीत दीर्घकालीन ऑक्सिजन देणारी वृक्षांची लागवड आज करत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहमारे यांनी सांगितले की, पर्यावरण शुद्ध ठेवायचे असेल आणि भरपूर प्रमाणात पाऊस पाहिजे असेल तर शासनाने वर्षातून एक महिना संपूर्णलॉक डाऊन करणे गरजेचे आहे यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन हवामान शुद्ध राखण्यास मदत.
यावेळी गटविकास अधिकारी सूर्यवंशी, साईबाबा संस्थान चे माजी विश्वस्त तांबे, मुख्याधिकारी सरोदे, नमामी गोदाचे पंडीत, प्राचार्य यादव सर आदींनी स्वछता व वृक्ष लागवडीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी नाशिक येथील विपुल भाई मेहता यांनी ५१ पत्रकार युसूफ रंगरेज यांनी ५ वृक्ष गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष ढाकणे यांना भेट दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय सांगळे, महारुदं गांलट, सौरभ मुंगसे निलेश पाटील सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बनसोडे यांनी तर आभार प्रा. गायकवाड यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत