वनविभागाच्या कार्यालयातून टेम्पो पळवून नेणाऱ्यांवर गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वनविभागाच्या कार्यालयातून टेम्पो पळवून नेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी         दिनांक 05/01/2021 रोजी. 07.30 वा. चे सुमा. वनपाल आर के पवार यांनी त्यांचे बरोबर असलेल्या स्टाफ  च्या मदतीने ...

अहमदनगर प्रतिनिधी

        दिनांक 05/01/2021 रोजी. 07.30 वा. चे सुमा. वनपाल आर के पवार यांनी त्यांचे बरोबर असलेल्या स्टाफ  च्या मदतीने कापरेवाडी गावच्या शिवारात टेम्पो नंबर MH 04 EY 1559 हा  विनापरवाना बेकायदा लिंबू प्रजातीची झाडे तोडून त्याचे लाकूड घेऊन त्याची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने सदरचा टेम्पो हा कारवाई करणेकामी वनपरिक्षेत्र रेहेकुरी अभयारण्य इथे आणून लावला होता व सदर टेम्पो व टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर राहणार बेलगाव तालुका कर्जत याच्यावर भारतीय अधिनियम 1927 चे कलम 41 व 52 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास चालू असतानाच दि. 09/07/2021.रोजी दुपारी 02.00 वाजेच्या सुमारास पाऊस चालू असताना सदर टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर यांचे सोबत अनोळखी 2 इसमा सह मोटार सायकल वर येऊन टेम्पो लावलेले ठिकाणी येऊन वनपाल किसन एकनाथ नजन यांचे रखवाली असलेला सदर  टेम्पो वरील लोकांनी वनपाल यांचे संमतीशिवाय चोरून नेला त्याचे वर्णन खालील प्रमाणे

300000 रु किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो त्याचा पासिंग नंबर MH 04 EY 1559 असा आहे. 

            सदर चा घडलेल्या घटनेवरून वनपाल किसन एकनाथ नजन यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 437/2021 भादवी कलम 186, 189, 379, 34 प्रमाणे टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर व अनोळखी दोन इसम यांचे विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पो ना यमगर हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत