प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) जनजागृती  रथ,तसेच हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी...


कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) जनजागृती  रथ,तसेच हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी फिरता जनजागृती रथ असे दोन रथ कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार आहे.


या रथांना कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे.याप्रसंगी भारती एक्सा कंपनीचे प्रतिनिधी पंकज रोहोम,कृषि अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे कृषि अधिकारी पंडित वाघिरे, विस्तार अधिकारी कृषि बाळासाहेब साबळे,श्री.वाकचौरे,कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


सदर रथास प्रधानमंत्री पीक विमा योजना व हवामान आधारित फळपिक विमा योजने संदर्भात माहिती फलक लावण्यात आले आहे.तसेच अनाउन्समेंट द्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.


प्रधानमंत्री पीक योजना व हवामान आधारित फळपिक विमा योजना शेतकऱ्यांनी समजून घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा.असे आवाहन तहसिलदार श्री.योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी श्री.अशोक आढाव यांनी तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत