चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक उपक्रम

कोपरगाव प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधत कोपरगावमध्ये बुधवार (द...

कोपरगाव प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधत कोपरगावमध्ये बुधवार (दि.२१) रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 


यामध्ये प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना पैठणीचे प्रशिक्षण देण्यात आले. पैठणीला महिला वर्गामध्ये मोठे आकर्षण आहे. आपल्या कडे पैठणी असावी असे अनेक महिलांना वाटत असते त्यामुळे पैठणी उद्योगाला नेहमीच चांगले दिवस असतात.  कोरोना संकटात महिला पैठणीचे प्रशिक्षण मिळाल्यास या महिला पैठणी विणण्यात तरबेज होवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार देवू शकतात. त्या उद्देशातून एस.एस. पैठणीच्या संचालिका सौ. जयश्री शिंदे यांच्या सहकार्याने महिलांना हातमागावर पैठणी विणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.


 याप्रसंगी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले, सौ. माधवी वाकचौरे, रश्मी कडू, श्रीमती शोभा घायतडकर, कल्याणी जाधव, ज्योती शिंदे, आशाताई कासार, विठाबाई पवार उपस्थित होत्या. तसेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक २ मधील कार्यकर्त्यांनी एसएसजीएम महाविद्यालयातील कर्मवीर शंकरराव काळे कोविड साहेब कोविड केअर सेंटरमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप केले.

जीवघेण्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक २ मधील कार्यकर्ते सौ.चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजिक उपक्रम राबवीत असतात. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटामुळे यावर्षी  वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कोविड केअर सेंटरमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्याचा निर्णय घेवून बुधवार (दि.२१) रोजी विविध प्रकारची फळे कोविड केअर सेंटरमधील प्रमुखांकडे रुग्णांना देण्यासाठी सोपविण्यात आली.

 यावेळी माजी नगरसेवक कृष्णा आढाव, अनिरुद्ध काळे, संदीप सावतडकर, राजेंद्र बोरावके, तुषार सरोदे, विजय बागडे, योगेश वाणी, रुपेश वाकचौरे, विशाल निकम, सोमनाथ आढाव, कार्तिक सरदार, आशिष राजपाल, अभिजीत सरोदे, रोहन माळोदे, ऋतुराज काळे, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. कुणाल घायतडकर आदी उपस्थित होते.


           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत