पानेगाव नेवासा तालुक्यातील पानेगाव ग्रामपंचायतने विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाचे कृषिदूत अभिषेक अशोक गागरे याचे स्...
पानेगाव
नेवासा तालुक्यातील पानेगाव ग्रामपंचायतने विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाचे कृषिदूत अभिषेक अशोक गागरे याचे स्वागत केले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले , मुळा कारखान्याचे संचालक रंगनाथ जंगले,पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, उपसरपंच रामभाऊ जंगले तसेच बाळासाहेब काकडे, विशाल जंगले, अक्षय चिंधे आदी उपस्थित होते. कृषिदूत अभि गागरे याने गावातील शेती विषयक समस्यांची माहिती संकलित करीत शेतीविषयक मार्गदर्शन केले.
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एच. एल. शिरसाठ, प्रा. डॉ. व्ही. एस. निकम, प्रा. डॉ. एस. बी. राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, प्रा. पी. आर. हसनाळे, प्रा. के. बी. मोरे, प्रा. एस. व्ही. भोसले, प्रा. डी. एन. नलावडे आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत