कोपरगाव/प्रतिनिधी कोपरगाव शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. याचा घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठा त्र...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोपरगाव शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. याचा घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठा त्रास होत आहे. त्यातच कोरोना संकटामुळे राज्य शासनाने निर्बंध लागू केलेले असल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचे वीज नसल्याने मोठे नुकसान होत आहे. याची महावितरण कंपनीने गंभीर दखल घेऊन येत्या आठ दिवसांत वीजेचे प्रश्न सोडवावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल, असा इशारा शहराध्यक्ष सतीष काकडे यांनी दिला आहे.
याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मनःस्ताप होत आहे.
शासनाच्या कोरोना नियमांनुसार निर्धारित वेळेतच व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी असल्याने अनेक व्यवसाय वीजेअभावी बंद ठेवावे लागत आहे. यातून मोठे नुकसान होत आहे. तसेच शाळा व महाविद्यालयेही बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यांनाही वीज नसल्याने तत्सम उपकरणे वापरणे अवघड होत आहे. सेतू केंद्रांतही वीजेअभावी कामे खोळंबत आहे. अनेक ठिकाणी वीजवाहक तारांचे झाडांच्या फाद्यांना घर्षण होते. यातून दुर्घटना झाल्यास महावितरण जबाबदार असले. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वीजेच्या सर्व समस्या सोडवाव्यात. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल
असा इशारा शहराध्यक्ष सतीष काकडे, तालुकाध्यक्ष अलीम शहा, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ, हिंदू सम्राटचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी, उपशहराध्यक्ष संजय जाधव, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, युवा नेते नवनाथ मोहिते, राजू जाधव, मोहन चव्हाण, संतोष जाधव आदिंनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत