वळण येथे १६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांना सुरूवात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण येथे १६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांना सुरूवात

राहुरी/प्रतिनिधी     राहुरी तालुक्यातील वळण ग्रामपंचायत अंतर्गत १६ लक्ष रूपये अंदाजापञे असलेल्या विविध विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे...

राहुरी/प्रतिनिधी 

   राहुरी तालुक्यातील वळण ग्रामपंचायत अंतर्गत १६ लक्ष रूपये अंदाजापञे असलेल्या विविध विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे.बुधवार दि.२८ जुलै रोजी सरपंच सुरेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सदस्यांच्या हस्ते भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. 

     वळण ग्रामपंचायत हद्दिमधे १५ वित्त आयोगाअंतर्गत पाथरे रस्ता पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन करीता  १४,४,९९७ रूपये ,दावल मालिक मंदिर ते टाकळी रोड रस्ता काँक्रिटीकरण  १३,२,६७८ रूपये ,गावातील मुख्य चौकात काँक्रीटीकरण रस्ता २,२१,१०४ रूपये,गोलवड वस्ती पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ९,५,९६९ रूपये,  आढाव वस्ती वरील जगदंबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण २,२४,५११ रूपये ,मुळा नदिकडे जाणारा कानडे घराकडील आर.सी.सी. गटार बांधकाम १,१६,९२७ रूपये ,जि.प.शाळा ते ठोंबरे घराकडील रस्ता काँक्रिटीकरण २,२६,६१५ रूपये आणि दलित वस्ती सुधार योजनेतुन आर.सी.सी.गटार बांधकामासाठी ४,४५,९५८ रूपये अंदाजापञे असलेल्या अशा एकुन १६ लाख ८ हजार ७५९ रूपये एकुण अंदाजापञे असलेल्या या विकास कामांची सुरवात करण्यात आली आहे.

     सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,जेष्ठ सदस्य अशोक कुलट,संजय शेळके,सुभाष ठाकर,आशाबाई  खुळे, लिलाबाई गोसावी, विमल रंधे,शोभा आढाव,पूजा फुणगे,ललिता आढाव ग्रामसेवक संतोष राठोड आदिंनी या विकास कामाच्या मंजुरीसाठी विशेष  परीश्रम घेतले.


कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताञय खुळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर खुळे,पोलिस पाटील सोमनाथ डमाळे, बी.आर.खुळे,बाळासाहेब शिंदे, सिताराम गोसावी, रोहिदास आढाव,अशोक काळे,नितीन आढाव,रोहिदास रंधे,पञकार वसंत आढाव,विजय ठुबे,बबन कार्ले,किरण आढाव,उमेश खिलारी,अदिनाथ कार्ले आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत