देवळाली प्रवरात गावठी दारू अड्डे उध्वस्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात गावठी दारू अड्डे उध्वस्त

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डावर शुक्रवार 9 जुलै रोजी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत दारू अड्डे उद्ध्वस...



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डावर शुक्रवार 9 जुलै रोजी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत एकूण 1,82,950 रुपयांचा मुद्देमाल देखील  जप्त करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि राहुरी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने हि धडक कारवाई केली आहे.


 पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 6240  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 118  लिटर   व तसेच 200   किलो नवसागर  असा एकूण 1,82,950  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला,त्यानुसार  आशाबाई बाळासाहेब गायकवाड,मयूर अनिल गायकवाड,सतिश वसंत गायकवाड , बापू भास्कर गायकवाड ,मंगल बापू गायकवाड आणि  एक अज्ञाताविरोधात   भादंवि कलम 328, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) नुसार PC 

नितीन शिरसाठ नेमणूक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक  डॉ. दिपाली काळे, गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक  संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक नितेश शेंडे पोलीस निरीक्षक  नंदकुमार दुधाळसह पोलिस  अधिकारी व अंमलदार आदींनी केली आहे.


राहुरी तालुक्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्याने तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत