मराठा आरक्षणावर ठोक भुमिका घेण्यासाठी नानासाहेब जावळे १३ जुलैला नगर दौऱ्यावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मराठा आरक्षणावर ठोक भुमिका घेण्यासाठी नानासाहेब जावळे १३ जुलैला नगर दौऱ्यावर

अहमदनगर(वेबटीम)   मंगळवार दि.१३ रोजी मराठा आरक्षणावर ठोक भूमिका घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी अखिल भारतीय छावा केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जाव...

अहमदनगर(वेबटीम)

  मंगळवार दि.१३ रोजी मराठा आरक्षणावर ठोक भूमिका घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी अखिल भारतीय छावा केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील नगर जिल्हा दौरा करणार आहेत.नगर येथे सकल मराठा समाजाच्या प्रतिनीधीं सोबत बैठक घेवून मराठा आरक्षणा विषयी ठोक भुमिका मांडणार आहेत.श्री.जावळे पाटील यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यामुळे समन्वयकांना नविन उत्साह संचारला आहे.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथिल दुर्घटने नंतर संपूर्ण महाराष्ट्र भर मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे स्वंयम स्पुर्तीने शांततेच्या मार्गाने आंदोलने झाली. आंदोलना नंतर राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासन देवून मराठा समाजाची फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.कोपर्डी दुर्घटनेला जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होवून देखील आरोपींना अजून पर्यंत शिक्षा झालेली नाही.राज्यकर्त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी अदृश्य शक्ती बनून मराठा समाजात फुट पाडून आरक्षणाचे आंदोलन उधळून लावण्याचा कुटील डाव आखलेला आहे.मराठा आरक्षण विरोधी कुटील डाव उधळून लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोक भुमिका घेवून श्री.नानासाहेब जावळे पाटील नगर दौऱ्यावर येत आहेत.

श्री.नानासाहेब जावळे पाटील यांच्यासह अ.भा.छावा संघटनेची राज्य सदस्य मंगळवार दि.१३ रोजी सकाळी १० वाजता जामखेड येथे आगमन होणार आहे.दुपारी १२ वा. कोपर्डी येथे श्रद्धा सुद्रीक यांच्या पाचव्या पुण्यसमरण कार्यक्रमास भेट देऊन दुपारी ३वा. विश्रामगृह नगर येथे सकल मराठा समाज्याच्या प्रमुख पदाधिकारी सोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर ५ वाजता विश्रामगृह येथे  पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षण विषयी ठोक भूमिका मांडणार आहेत. 

श्री.नानासाहेब जावळे पाटील यांच्या सोबत केंद्रीय सह कार्याध्यक्ष भीमराव मराठे,वि.आ.प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील , प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी सुर्यवनशी आदी राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लाबे पाटील ,यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत