साई संस्थांनच्या अध्यक्षपदी आ. निलेश लंके यांची निवड करावी,अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई संस्थांनच्या अध्यक्षपदी आ. निलेश लंके यांची निवड करावी,अँड.नितीन पोळ

कोपरगाव वेबटीम साई बाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाच्या निवडी विविध कारणांनी न्यायालयात गेल्या असून साई बाबा संस्थांच्या अध्यक्ष पदी आ...

कोपरगाव वेबटीम

साई बाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाच्या निवडी विविध कारणांनी न्यायालयात गेल्या असून साई बाबा संस्थांच्या अध्यक्ष पदी आ निलेश लंके यांची निवड करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की साई बाबा यांनी त्यांच्या आयुष्यात रुग्ण सेवेला मोठे महत्व दिले तर साई बाबा यांनी स्वतः अनेक गोरगरीब व दुर्धर आजार असलेल्या रुग्णावर स्वतः उपचार केले कोविड कालावधीत कोणतीही मोठी संस्था नसताना आ निलेश लंके यांनी हजारो रुग्ण संख्येचे कोविड सेंटरची उभारणी केली नुसती कोविड सेंटरची उभारणी करून न थांबता स्वतः त्या ठिकाणी थांबून अनेक गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार दिला व हजारो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले त्यांच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,सुप्रिया ताई सुळे अजित पवार यांनी देखील त्यांच्या रुग्ण सेवेच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली.

योगायोगाने शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया व त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेत राजकीय पुणर्वसन करण्या पेक्षा सर्व सामान्य नागरिकांच्या  हितासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या विश्वस्त नेमणे आवश्यक आहे शिर्डी संस्थांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून त्या ठिकाणी अनेक गोरगरीब रुग्ण उपचार घेतात मात्र त्याकडे काळ्या काचेच्या गाडीतून प्रवास करणारे कोणतेच विश्वस्त लक्ष देत नाहीत.


 या उलट संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आ निलेश लंके यांच्या रुग्ण सेवेची चर्चा होत आहे त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या जिवाभावाची व्यक्ती म्हणून निलेश लंके यांच्या हाती साईबाबा संस्थांचे अध्यक्ष पद दिल्यास सामान्य जनतेला खूप मोठा दिलासा मिळेल त्याच प्रमाणे ते विश्वस्त निवडीचे सर्व निकष पूर्ण करणारे असून या निमित्ताने एका राजकीय व्यक्ती पेक्षा स्वतःच्या कार्या चा ठसा उमटवलेल्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव होईल त्यामुळे साई बाबा संस्थांच्या अध्यक्ष पदी आ निलेश लंके यांची निवड करण्यात यावी असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत