गावातील वाद आपापसात मिटवा- वासुदेव देसले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गावातील वाद आपापसात मिटवा- वासुदेव देसले

कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. देसले  यांनी डाऊच खुर्द गावाला गाव भेट दिली. त्या दरम्यान  मार्गदर्शन केले त्यावेळी सरपंच उप...



कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. देसले  यांनी डाऊच खुर्द गावाला गाव भेट दिली. त्या दरम्यान  मार्गदर्शन केले त्यावेळी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 डाऊच खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की काही गोष्टी सामंजस्याने घेतले पाहिजे कुणी एखादा चुकला तर त्याला माफ करण्यास शिकलं पाहिजे त्याला समजून सांगा जर एखाद्या चा शेतीवरून वाद असेल तर तो आपसात मिटवा गावातील  सरपंचांना प्रतिष्ठित नागरिकांना तंटामुक्ती अध्यक्षांना एकत्र बोलून चर्चा करा चर्चेतून मार्ग निघतो चुका करणे हा माणसाचा धर्म आहे पण त्या चुका सुधारणे ह्या माणुसकीचे एक लक्षण आहे.अतिशय सुंदर हे जीवन आहे जगण्याचा शिकलं पाहिजे जीवन जगण्यात मजा आहे गावातील कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करत चला यातून गावाचा प्रगतीचा मार्ग नक्कीच उंचावेल तंटामुक्ती ग्राम पुरस्कारासाठी नक्कीच प्रयत्न करू गेल्या चार वर्षांमध्ये डाऊच खुर्द गावातून एक पण एक पण फिर्याद  आलेली नाही त्याबद्दल गाव तील लोकांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पवार शंकर गुरसळ सलीम शेख चंद्रकांत गुरसळ गंगाराम पीठे शशिकांत पवार राजेश पवार सुनील गुरसळ बाळासाहेब गुरसळ पोलीस पाटील गायकवाड योगेश पवार संदीप गुरसळ संदीप पवार अशोक नाना कुलकर्णी आदी ग्रामस्थ उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत