मुसळवाडीसह ९ प्रादेशिक योजनेच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची फिल्डींग! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुसळवाडीसह ९ प्रादेशिक योजनेच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची फिल्डींग!

आरडगाव(राजेंद्र आढाव) मुसळवाडीसह ९ प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. या निवडीत ...

आरडगाव(राजेंद्र आढाव)

मुसळवाडीसह ९ प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. या निवडीत राजकीय हस्तक्षेप  होण्याची शक्यता वर्तवली जात असून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुसळवाडीसह ९ प्रादेशिक पाणीयोजनेच्या अध्यक्षपदाची निवड सोमवार दि. २८ जुन राहुरी पंचायत समितीच्या  स्व. डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. हि निवड लोकशाही पध्दतीने न करता दबावतंत्राचा वापर केला तर बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसिंटगवर खोट्या सह्या करत गुप्त पध्दतीने मतदानाचा अग्रह धरला आसे आरोप प्रत्यारोप झाल्याने काही काळ गोंधळ होऊन हि निवड रद्द करण्यात आली होती. 

पुन्हा याच ठिकाणीशुक्रवार दि. 23 जुलै रोजी सकाळी 12 वाजता निवड प्रकिया होणार आहे.

मुसळवाडी अमृत धुमाळ ,सारिका घोलप, मांलुजे खर्द डॉ सर्जेराव सोळुंके सुभाष पवार,माहेगांव सौ.शारदा आढाव वाल्मिक गायकवाड, खुडसरगांव बबाबाई माळी रामेश्वर पवार, पाथरे निता घारकर, श्रीकांत जाधव, कोपरे कविता जाधव द्वारकानाथ जाधव, वांजुळपोई सविता कोळपे शिवाजी पवार, तिळापुर सुधाकर पवार बापु आघाव या सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत